You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबईत पार्किंगचा प्रश्न कधी सुटणार? मुंबईकर संतापलेले का आहेत? - ग्राऊंड रिपोर्ट
मुंबईत पार्किंगचा प्रश्न कधी सुटणार? मुंबईकर संतापलेले का आहेत? - ग्राऊंड रिपोर्ट
राज्याच्या परिवहन विभागाच्या माहितीनुसार 2024 पर्यंत मुंबईत 48 लाखांहून अधिक वाहनं नोंदणीकृत आहेत. यात 28 लाख दुचाकी, उर्वरित चारचाकी आणि तीनचाकी वाहने आहेत. पण मुंबई महापालिका आणि खाजगी जागांमध्ये मिळून फक्त सुमारे पावणे दोन लाख वाहनांचीच पार्किंग क्षमता उपलब्ध आहे. म्हणजे मुंबईच्या रस्त्यांवर वाहनं प्रचंड आहेत आणि पार्किंग अपुरं आहे.
पार्किंगची समस्या केवळ वाहनसंख्या वाढल्यामुळे नाही. तर लोकांची सार्वजनिक वाहतुकीकडून खाजगी वाहनांकडे वळलेली मानसिकता असल्याचं शहर नियोजन तज्ज्ञ सांगतायत.
- रिपोर्ट- अल्पेश करकरे
- शूट- शार्दुल कदम
- व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर