You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'इथे टॉयलेट नाही, पाणी नाही, क्लासरुम नाही'; महाराष्ट्रातील सरकारी शाळांची स्थिती कशी आहे?
महाराष्ट्रातील अनेक सरकारी शाळांची परिस्थिती गंभीर आहे. UDISE अहवालात महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये इमारती, वीज, इंटरनेट, टॉयलेट संबंधातील त्रुटींवर बोट ठेवण्यात आलंय.
बीबीसी न्यूज मराठीची टीम सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या अडचणी समजून घेण्यासाठी शहरी तसंच ग्रामीण भागातील काही शाळांमध्ये गेली.
टॉयलेटमध्ये पाणी नाही, सॅनिटरी पॅड उपलब्ध नाहीत, वर्गखोली नसलेल्या शाळा, पत्र्याच्या खोल्यांमध्ये चालणारं शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नचिन्ह ठळकपणे पुढे आला.
पुणे आणि यवतमाळ इथल्या शाळा शाळेच्या दुर्देशेच्या प्रातिनिधीक उदाहरण आहेत. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर संबंधित मंत्री आणि अधिकारी यांच्याकडून यावर काहीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
रिपोर्ट- प्राची कुलकर्णी
रिपोर्टिंग सहाय्य - भाग्यश्री राऊत
शूट- नितीन नगरकर, मनोज आगलावे
व्हीडिओ एडिट- शरद बढे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)