You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Live : बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्याचे थेट प्रक्षेपण
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी न्यूज
बीबीसीच्या स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर 2024 पुरस्काराच्या च्या मानकरी खेळाडूच्या नावाची घोषणा दिल्लीत एका सोहळ्यात होत आहे. जगभरातील क्रीडा चाहत्यांनी मतदानाद्वारे त्यांच्या आवडीच्या महिला क्रीडापटूला मतदान करून विजेतीची निवड केली आहे.
बीबीसीच्या स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर या पुरस्काराचं हे पाचवं वर्ष आहे. यंदा पुरस्कारासाठी गोल्फपटू आदिती अशोक, नेमबाज मनू भाकर, अवनी लेखरा, क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि कुस्तीपटू विनेश फोगाट यांची नामांकनं जाहीर करण्यात आली होती.
या पाचही क्रीडापटूंबाबत जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
जानेवारी महिन्यात बीबीसीने निवडलेल्या ज्युरीने या पाच भारतीय महिला क्रीडापटूंची निवड केली होती. या ज्युरीमध्ये देशभरातील काही नामांकित क्रीडा पत्रकार, तज्ज्ञ आणि लेखकांचा समावेश आहे. त्यानंतर विजेत्या क्रीडापटूची निवड करण्यासाठी क्रीडा चाहत्यांच्या मतदानासाठी ही नावं जाहीर करण्यात आली.
यावर्षीच्या पुस्कारांची थीम 'चॅम्पियन्स चॅम्पियन' अशी होती. या क्रीडापटूंना कारकीर्द घडवून पदकं मिळवण्यासाठी मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन करणाऱ्यांच्या योगदानाकडं त्याद्वारे विशेष लक्ष वेधण्यात आलं.
या उपक्रमाबद्दल भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बीबीसीच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.