दलित खाद्यसंस्कृती काय आहे? ती इतर समाजापेक्षा वेगळी कशी?

दलित खाद्यसंस्कृती काय आहे? ती इतर समाजापेक्षा वेगळी कशी?

दलित समाजातील खाद्यसंस्कृतीविषयी लेखक शाहू पाटोळे यांनी लिहिलेलं 'अन्न हे अपूर्णब्रह्म' हे पुस्तक मराठी साहित्यविश्वात चर्चेचं केंद्र ठरलंय.

या पुस्तकात महाराष्ट्रातील आणि विशेषत: मराठवाड्यातील दलित समाजात वर्षानुवर्षे कोणते पदार्थ बनवले जायचे, त्यांची सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि विशेषत: जातींची पाश्वभूमी काय आहे, याविषयी पाटोळेंनी सविस्तर लिहिलंय.

नुकतेच शाहू पाटोळेंचं हे पुस्तक 'Dalit Kitchens Of Marathwada' या नावाने इंग्रजीमध्येही प्रकाशित झालं आहे.

याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने त्यांच्याशी खास बातचित केली. त्यासंदर्भातील हा विशेष रिपोर्ट पाहा.

  • व्हीडिओ रिपोर्ट : अंतरिक्ष जैन, गणेश पोळ
  • व्हीडिओ एडिट : निलेश भोसले