You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
छोट्या गॅरेजमध्ये सुरू झालेली 'ही' खास शाळा 39 वर्षांपासून बौद्धिकदृष्ट्या अपंग मुलांना कसा आधार देते?
कोल्हापूरची चेतना अपंगमती विकास संस्था ही गेल्या 39 वर्षांपासून बौद्धिकदृष्ट्या अपंग मुलांच्या शिक्षण आणि पुनर्वसनासाठी कार्यरत आहे.
1986 मध्ये पवन खेबुडकर आणि त्यांच्या मित्रांनी कोल्हापूरमधील एका छोट्या गॅरेजमध्ये या शाळेची स्थापना केली. त्यावेळी केवळ 20 मुलांपासून सुरू झालेली ही शाळा आता 200 हून अधिक मुलांना आधार देत आहे.
ही शाळा केवळ औपचारिक शिक्षणच नाही, तर बेकिंग, हस्तकला, कागदी शिल्पे बनवणे आणि पर्यावरणपूरक मूर्ती तयार करणे यांसारखे व्यावसायिक प्रशिक्षणही देते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर होण्यास मदत होते.
इथल्या मुलांच्या पालकांनुसार, चेतना शाळा या मुलांच्या विशेष गरजा समजून घेते, त्यांना फिजिओथेरपी, मोटर स्किल्स प्रशिक्षण आणि वैयक्तिक शिक्षण पुरवते. महत्त्वाचे म्हणजे, सर्व सेवा विनामूल्य आहेत.