You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
औरंगजेबाशी संबंधित आंदोलनाची धग नागपुरात कशी पोहोचली? - ग्राऊंड रिपोर्ट
छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलनं सुरू आहेत.
17 मार्चला मात्र नागपुरात झालेल्या आंदोलनानंतर दंगल उसळली. एरवी शांत असलेल्या नागपूरकरांना दगडफेक, जाळपोळ सारख्या घटनांना सामोरं जावं लागलं. ज्या परिसरात ही घटना घडली तिथं आता तणावपूर्ण शांतता आहे. दुकानं बंद आहेत. जागोजागी पोलीस पहारा देत आहेत. पण कालच्या घटनांच्या खाणाखुणा आजही तिथं स्पष्ट दिसतात.
दुकानांच्या काचा फुटलेल्या आहेत, काही ठिकाणी दगड-विटांचा खच दिसतो, जमावानं जाळलेल्या गाड्यांचे सांगडे तसेच होते.
काही दुकानदार, नागरिक आपल्या घर आणि दुकानांसमोर उभे होते. बीबीसीनं काही प्रत्यक्षदर्शींशी संवाद साधला.