You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हज यात्रेदरम्यान यंदा शेकडो यात्रेकरूंचा मृत्यू होण्यामागे काय कारणं आहेत?
यावर्षीच्या हज यात्रेदरम्यान किमान 1301 जणांचा मृत्यू झाला, अनधिकृतरित्या आलेले हे यात्रेकरू कडक उन्हामध्ये मोठं अंतर चालल्याचं सौदी अरेबियाकडून सांगण्यात आलंय.
यावर्षीची हज यात्रा पार पडली तेव्हा तापमान अनेकदा 50 डिग्रीजपेक्षाही जास्त होतं.
यात्रेदरम्यान मृत्यू झालेल्यांपैकी 75% लोकांकडे तिथे असण्यासाठीचं परमिट नव्हतं आणि पुरेसा आडोसा नसताना ते थेट उन्हामध्ये चालल्याचं सौदी अरेबियाची वृत्तसंस्था SPAने म्हटलंय. यापैकी काहीजण वयस्कर होते, आधीपासून आजारी होते, असंही सांगण्यात आलंय.
उन्हापासून असणारे धोके काय आहेत आणि ते कसे टाळायचे याबद्दलची जागृती करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते, असं सौदीचे आरोग्य मंत्री फहाद अल्-जलाजेल यांनी म्हटलंय.
अधिकृत परवाना नसणाऱ्या 1 लाख 40 हजारांपे७ा जास्त यात्रेकरूंवर उपचार करण्यात आले असून यापैकी काही अजूनही हॉस्पिटलमध्ये असल्याचं त्यांनी सांगितलंय.
परवान्याशिवाय येणाऱ्या प्रवाशांसाठी हज यात्रा अधिक सुरक्षित न केल्याची टीका जगभरातून सौदीवर करण्यात येतेय.
हज ही एक वार्षिक यात्रा आहे ज्यासाठी मुस्लीम दरवर्षी मक्केला जातात. यावर्षीच्या हज यात्रेत 18 लाख यात्रेकरूंनी भाग घेतल्याचं सौदी अरेबियाने म्हटलंय. मग यावर्षी इतक्या भाविकांचा मृत्यू होण्यामागे काय कारणं आहेत?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
- रिपोर्ट - टीम बीबीसी
- निवेदन - गुलशन वनकर
- एडिटिंग - निलेश भोसले