You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
SCO शिखर संमेलनात कैलास मानसरोवर यात्रेबाबत काय म्हणाले पंतप्रधान मोदी, भारत-चीन संबंधांसाठी यात्रा का महत्त्वाची?
( ही बातमी 30 जून रोजी अपडेट करण्यात आली होती. शिखर संमेलनाच्या निमित्ताने ती पुन्हा अपडेट करत आहोत.)
चीनमधील तियानजिंग येथे सुरू असलेल्या SCO शिखर संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची चर्चा द्विपक्षीय चर्चा झाली. पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले की माझे हार्दिक स्वागत केल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो.
चर्चेदरम्यान, कैलास मानसरोवराच्या यात्रेचा उल्लेख करण्यात आला.
पंतप्रधान मोदी म्हणाले, "दोन्ही देशातील संबंधांना एक सकारात्मक दिशा मिळाली आहे. सीमेवर शांतता आणि स्थिरतेचे वातावरण आहे. कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू झाली आहे."
दोन्ही देशातील 2.8 अब्ज लोकांचे हित या आपल्या परस्पर सहकार्यावर अवलंबून आहे, असे पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटले.
काही वर्षांच्या खंडांनतर या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीमध्ये या यात्रेबाबत घोषणा करण्यात आली होती. तसेच 30 जूनला ही यात्रा पुन्हा सुरू झाली होती.
कैलास आणि मानसरोवराची मिळून यात्रा केली जाते. हिंदूंसोबतच बौद्ध, जैन आणि तिबेटी बॉन धर्मांचे अनुयायी ही यात्रा पायी करतात. या यात्रेशी चीनचा काय संबंध? कैलास मानसरोवर यात्रेचं आणि भारत - चीन संबंधांचं एकमेकांशी काय नातं आहे?
कैलास मानसरोवर यात्रेसाठी चीनची भूमिका का महत्त्वाची आहे?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट : अमृता दुर्वे
निवेदन : सिद्धनाथ गानू
एडिटिंग : शरद बढे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)