You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हरवलेल्या प्रेमाच्या शोधात एकाकी आयुष्य जगणारे केकी मूस
हरवलेल्या प्रेमाच्या शोधात एकाकी आयुष्य जगणारे केकी मूस
चाळीसगावासारख्या ठिकाणी आयुष्याची 50 वर्ष प्रेयसीची वाट पाहत, घराचा उंबरठा न ओलांडणारा केकी मूस हा विश्वविख्यात छायाचित्रकार. ज्यानं तीनशेहून अधिक सुवर्णपदकं मिळवली. आपल्या अनेक छायाचित्रांना, कलाकृतींना त्या दगडी हवेलीत बंदिस्त राहून जन्म दिला.
या थोर कलामहर्षीनं जवळपास पाच दशकं विजनवासात घालवली. त्यांच्या प्रेमाची आणि कलासाधनेची ही गोष्ट.
रिपोर्ट - अनघा पाठक, प्रियंका जगताप
शूट - मंगेश सोनवणे
व्हीडिओ एडिट - निलेश भोसले