धुळ्यातील या दोन शेतकऱ्यांनी आपलं आयुष्य का संपवलं?

धुळ्यातील या दोन शेतकऱ्यांनी आपलं आयुष्य का संपवलं?

धुळे जिल्ह्यात गेल्या चार महिन्यात 15 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, अशी सरकारी आकडेवारी सांगते. यापैकी दोन कुटुंबांना बीबीसी मराठीची टीम भेटली. या शेतकऱ्यांवर जीव गमावण्याची वेळ का आली याविषयी त्यांचे नातलग सांगत होते.

कर्जबाजारीपणा आणि अतिवृष्टी यामुळे शेतकरी आणखी तणावाखाली गेले. धुळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सप्टेंबर महिन्यात धुळ्यात जास्त पाऊस झाला. इथल्या 19 गावांमध्ये अतिवृष्टीनंतर 18 हजार हेक्टर शेत बाधित झाल्याची नोंद आहे. आणि यासाठी पंचनामे करण्याचं काम सुरू आहे.”

रिपोर्ट- दीपाली जगताप

शूट- शाहिद शेख

व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)