You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अनगर नगरपंचायत निवडणूक वादात का? भाजप आणि अजित पवार गटात काय घडलं?
अनगर नगरपंचायत निवडणूक वादात का? भाजप आणि अजित पवार गटात काय घडलं?
अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या राजकारणाच्या वादाने नवीन वळण घेतलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्जच 18 नोव्हेंबरला बाद ठरवण्यात आला आहे.
याआधी अर्ज न भरण्यासाठी आपल्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप थिटे यांनी माजी आमदार आणि भाजप नेते राजन पाटील यांच्यावर केला होता.
त्यानंतर 17 नोव्हेंबरला त्यांनी पोलीस संरक्षणात अर्ज भरला. पण काही तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे हा अर्ज बाद करण्यात आला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)