मातंग समाजातील प्रशांतनं इंग्लंड सरकारची 55 लाखांची स्कॉलरशिप कशी मिळवली?

मातंग समाजातील प्रशांतनं इंग्लंड सरकारची 55 लाखांची स्कॉलरशिप कशी मिळवली?

सोलापूरच्या प्रशांत रणदिवेला यूके सरकारकडून 55 लाख रुपयांहून अधिक निधी असलेली चेवेनिंग स्कॉलरशिप मिळाली आहे.

या स्कॉलरशिपअंतर्गत लंडनमधील त्याच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च यूके सरकारकडून केला जाणार आहे. यात व्हिसा फी, कॉलेजची संपूर्ण फी, लंडनमधला निवास आणि जेवणाचा खर्च, तसंच भारतातून लंडनला जाण्या-येण्याचे विमान तिकीट यांचा समावेश आहे.

ही स्कॉलरशिप एका वर्षाच्या मास्टर्स अभ्यासक्रमासाठी दिली जाते. चेवेनिंग स्कॉलरशिप्स भारतातल्या सर्व नागरिकांसाठी खुल्या आहेत, पण त्यासाठी ग्रॅज्युएशन डिग्री झाल्यावर किमान 2 वर्षांचा कामाचा अनुभव असणं गरजेचं आहे. अधिक माहितीसाठी पाहा हा खास रिपोर्ट

  • रिपोर्ट, शूट आणि एडिट - गणेश पोळ, बीबीसी मराठी प्रतिनिधी

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)