'आम्ही मेल्यावर दखल घेणार का?' कुसगाव क्रशर विरोधात हे गावकरी सातारा ते मुंबई पायी का निघाले?

'आम्ही मेल्यावर दखल घेणार का?' कुसगाव क्रशर विरोधात हे गावकरी सातारा ते मुंबई पायी का निघाले?

वाई तालुक्यातील कुसगाव याठिकाणी गेल्या तीन वर्षापासून सुरू करण्यात आलेला स्टोन क्रेशर बंद करण्यासाठी एकसर कुसगाव आणि व्याहळी ग्रामस्थ वाई ते मंत्रालय असा पायी प्रवास करत आहेत. गेले 17 ते 18 दिवस ऊन पावसात पायी प्रवास करत वयोवृद्ध ते लहान मुलं मुंबईच्या जवळ असलेल्या नवी मुंबई परिसरात पोहोचले आहेत. गेल्या तीन वर्षापासून ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या समस्या सुटाव्या यासाठी हे गावकरी त्रस्त आहेत.